शिवसेना माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक आणि ८ पोलिसांवर गुन्हा दाखल

539 0

पुणे:शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक नारायण लोणकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांसह ८ पोलीस कर्मचारी आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या विरुद्ध देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,एका मासे विक्रेत्याने न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली होती.”भारत बंद आहे,तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर”…अशी धमकी देत माजी आमदाराने शिवीगाळ केल्याप्रकरणी या मासे विक्रेत्याने पोलिसात धाव घेतली होती.त्या नंतर पोलीस स्थानकामध्ये देखील या मासे विक्रेत्याला पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी देखील मारहाण केली होती.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार माजी आमदार महादेव बाबर,माजी नगरसेवक नारायण लोणकर,अब्दुल बागवान,असलम बागवान,राजेंद्र बाबर,दीपक रमाने,सईद शेख,राजू सय्यद,गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते,पोलीस कर्मचारी कामठे,गरुड,नफाद सुभानवाड,सुरेखा बडे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : दैव बलवत्तर म्हणून…! नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले 5 जणांचे प्राण

Posted by - August 13, 2023 0
सातारा : खंडाळा तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर शनिवार, दि. 12 रोजी पुण्याहून साताराच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात…

#Latest Updates : कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात वाचा , अत्यंत चुरशीची लढत , आतापर्यंत काय झाले ?

Posted by - March 2, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठीची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारांची धाकधूक सातत्याने वाढते आहे.…

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट ; राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

Posted by - September 7, 2022 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या…
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022 0
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने…

पाककलेचा समृद्ध वारसा संक्रमित करण्याची गरज – शेफ विष्णू मनोहर

Posted by - February 27, 2022 0
भारतीय पाककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. पाककलेमध्ये निपुण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *