Khadakwasala Dam

धक्कादायक ! खडकवासला धरणात 9 मुली बुडाल्या; 7 जणांना वाचवण्यात यश

11761 0

पुणे : पुण्यातील (Pune) खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धरणात सकाळी पोहायला गेलेल्या नऊ मुली पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात बुडाल्या. यामधील 7 मुलींना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे तर दोन जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास नऊ मुली गोरे बुद्रुक ( Gore Budruk) येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस खडकवासला धरणामध्ये पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक या मुली पाण्यात बुडाल्या. ही गोष्ट लक्षात येताच जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिक लोकांनी या 9 जणींपैकी 7 जणांना सुखरूप बाहेर काढले.

उरलेल्या दोघीजणी बेपत्त झाल्या होत्या. त्यानंतर पीएमआरडीएचे अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच हवेली पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरु करत बेपत्ता झालेल्या मुलींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Share This News

Related Post

पुणेकरांनो घरात मांजर पाळताय ? महापालिकेचा घ्यावा लागेल परवाना

Posted by - November 11, 2022 0
पुणे : पुणेकर मांजरप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे.पुणेकरांना आता कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

Posted by - September 10, 2022 0
पुणे : आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला पुष्प रणशिंग चौघडा, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतिषबाजी आणि सोबतीला…
drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या…

मोठी बातमी! क्रिकेटर केदार जाधवच्या वडिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Posted by - March 27, 2023 0
पुणे: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केदार जाधवच्या वडिलांना शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश आले असून मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *