उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात; पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 735 अर्ज

84 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहे. आज निवडणुकीची अधिसूचना प्रसारित होऊन नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

आज पासून म्हणजे 22 ऑक्टोबर पासून 29 पर्यंत तारखेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 735 उमेदवारी अर्ज आले असून सर्वाधिक उमेदवारी अर्ज आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 30 उमेदवारांचे 59 अर्ज दाखल झालेत. तर बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

कोणत्या मतदारसंघात किती अर्ज?

  1. जुन्नर विधानसभा 9 उमेदवार 26 अर्ज 
  2. आंबेगाव विधानसभा 30 उमेदवार 59 अर्ज 
  3. खेळ आळंदी विधानसभा 17 उमेदवार 44 अर्ज
  4. शिरूर विधानसभा 20 उमेदवार 55 अर्ज 
  5. दौंड विधानसभा 20 उमेदवार 40 अर्ज
  6. इंदापूर विधानसभा 13 उमेदवार 33 अर्ज 
  7. बारामती विधानसभा एक उमेदवार एक अर्ज 
  8. पुरंदर विधानसभा 14 उमेदवार 29 अर्ज
  9. भोर विधानसभा 10 उमेदवार 17 अर्ज
  10. मावळ विधानसभा सहा उमेदवार 15 अर्ज 
  11. चिंचवड विधानसभा 14 उमेदवार 35 अर्ज 
  12. पिंपरी विधानसभा 29 उमेदवार 59 अर्ज
  13. भोसरी विधानसभा 14 उमेदवार 25अर्ज
  14. वडगाव शेरी विधानसभा 26 उमेदवार 49 अर्ज 
  15. शिवाजीनगर विधानसभा 10 उमेदवार 25 अर्ज
  16. कोथरूड विधानसभा बारा उमेदवार 29 अर्ज 
  17. खडकवासल विधानसभा 19 उमेदवार 35 अर्ज
  18. पर्वती विधानसभा 19 उमेदवार 35 अर्ज 
  19. हडपसर विधानसभा 19 उमेदवार 46 अर्ज 
  20. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा 17 उमेदवार 52 अर्ज 
  21. कसबा पेठ विधानसभा 16 उमेदवार 29 अर्ज

एकूण उमेदवार 335 अर्ज संख्या 735

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide