भारतीय जनता पक्षाकडून नुकतीच 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत बंडाळीनं डोकं वर काढलंच मात्र भाजपाने जाहीर केलेल्या पाच जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने विरोध केल्याची माहिती समोर आली नेमक्या या पाच जागा कोणत्या आहेत आणि भाजपाचे हे पाच उमेदवार एकनाथ शिंदेंना का नकोसे आहेत यावरचा ‘TOP NEWS मराठी’चा स्पेशल रिपोर्ट…
भाजपाला 99 उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र या यादीत 80 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय… यासोबतच पाच विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून या ठिकाणी पाच वेगळे चेहरे देण्यात आले आहेत तर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दोन आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र यासोबतच 2019 मध्ये शिवसेनेनं लढवलेल्या पाच जागांवर भाजपानं उमेदवार दिले. आणि यावरूनच विचारात न घेता भाजपाने यादी जाहीर केली असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय.
नेमक्या या पाच जागा कोणत्या आहेत आणि 2019 मध्ये नेमकी लढत कशी झाली होती?
भाजप आणि शिवसेनेच्या जाहीर केलेल्या पाच जागांपैकी पहिली जागा आहे धुळे शहर मतदार संघाची. या मतदारसंघात भाजपानं अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिलीय
या मतदारसंघात 2019 मध्ये ‘एआयएमआयएम’ पक्षाकडून फारूक शाह, शिवसेनेकडून हिलाल माळी, लोकसंग्राम पक्षाकडून माजी आमदार अनिल गोटे, आणि अपक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी निवडणूक लढवली
या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या फारुक शहा यांचा 46,679 मतांनी विजय झाला
अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजवर्धन कदमबांडे यांना 43,372 मतं मिळाली होती
लोकसंग्राम पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार अनिल गोटे यांना 42,432 मतं मिळाली
शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे हिलाल माळी यांना 22,427 मतं मिळवत ते चौथ्या क्रमांकावर होते.
____________________________
धुळे शहरनंतर भाजपानं देवळी विधानसभा मतदारसंघातही उमेदवार दिला आहे या ठिकाणी 2019 ला अपक्ष लढलेल्या राजेश बकाने यांना भाजपानं संधी दिली आहे
2019 मध्ये काँग्रेसकडून रणजीत कांबळे, अपक्ष राजेश बकाने, शिवसेनेकडून समीर देशमुख, आणि वंचित बहुजन आघाडीकडून सिद्धार्थ डोईफोडे निवडणुकीच्या रिंगणात होते
या निवडणुकीत काँग्रेसचे रणजीत कांबळे 75,345 मतांनी विजयी झाले
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राजेश बकाने यांना 39,541 मतं मिळाली होती
शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे समीर देशमुख यांना 30,978 मतं मिळाली
वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे सिद्धार्थ डोईफोडे यांना 8,324 मतं मिळाली होती
____________________________
शिवसेनेच्या जागेवर भाजपानं उमेदवार दिलेली तिसरी जागा आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघाची या जागेवर भाजप आणि प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, काँग्रेसकडून अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख, शिवसेनेकडून सुनिता फिस्के यांना उमेदवारी मिळाली होती.
या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे 81,252 मत मिळवत विजयी झाले
या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांना 72,856 मतं मिळाली होती
शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या सुनिता फिस्के यांना या निवडणुकीत 15,064 मतं मिळाली होती
____________________________
2019 मध्ये शिवसेनेने लढवलेल्या जागेवर भाजपाने उमेदवार दिलेले चौथी जागा आहे उरण विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी 2019 मध्ये अपक्ष लढलेले आणि सध्या आमदार असणारे महेश बालदी यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे
2019 मध्ये उरणमधून अपक्ष महेश बालदी, शिवसेनेकडून मनोहर भोयर निवडणुकीच्या रिंगणात होते
या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या महेश बालदी यांना 74,549 मतं मिळाली होती
शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे मनोहर भोईर यांना 68,839 मतं मिळाली होती
____________________________
शिवसेनेच्या जागेवर भाजपाने उमेदवार दिलेली पाचवी जागा आहे नालासोपारा विधानसभा मतदारसंघाची या जागेवर भाजपानं राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे
2019 मध्ये नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेकडून ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात होते
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना 1,49,868 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला
तर शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ प्रदीप शर्मा यांना 1,61,039 मतं मिळाली होती
____________________________