Breaking News

पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 कर्मचारी बडतर्फ

336 0

नुकतीच पुणे महानगर पालिकेत 23 गावं नव्यानं समाविष्ट झाली. या 23 समाविष्ट गावातून ग्रामपंचायतींनी बोगस भरती केल्यास 46 कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं बडतर्फ केलं आहे. यामध्ये तब्बल 27 कर्मचारी एकट्या बावधन बुद्रुक येथील असून त्यानंतर 12 कर्मचारी नऱ्हे ग्रामपंचायतीतील आहेत.

शेवाळवाडी,भिलारवाडी,मांगडेवाडी,अन्य 20 गावांना शासनाने पुणे महानगर पालिकेत सामाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बोगस कर्मचारी भरती झाल्याचं निदर्शनास येत आहे.

ही गावं समाविष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेनं ग्रामपंचायतींच्या मालमत्ता व कर्मचारी वर्गीकरण यांचं दप्तर ताब्यात घेतलं

कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती स्थापन केली होती या चौकशी समितीत या समाविष्ट गावात बोगस भरती झाल्याचं निदर्शनास आलं

Share This News
error: Content is protected !!