पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर भागात लेन क्रमांक आठ मध्ये स्लॅपसाठी करण्यात आलेली लोखंडी छताची जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता.3) रात्री घडली.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला होता त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली होती
या घटनेनंतर आता सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतीयाज अबुल बरकात अन्सारी, लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम, प्रोजेक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धायकुडे , प्रोजेक्ट मॅनेजर मजीद खान या चौघांना अटक करण्यात आलीय