पुण्यात कधीही काहीही घडू शकतं असं म्हणतात नुकताच पुणे महानगपालिकेचा प्रारुप प्रभाग जाहीर झालं आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोस्टर वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
पुण्यात चौका चौकात बॅनर लावलेले दिसत आहेत, नको बापट नको ,टिळक पुणेकरांना पाहिजे नवी ओळख, धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत… असे बॅनर लावून विरोधक एकमेकांविरोधात बॅनरबाजी करत आहेत.
नगरसेवक धीरज घाटे यांनी नागरीकांच्या मदतीसाठी ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशा प्रकारचा फ्लेक्स लावला आहे. त्यावरच प्रतिउत्तर म्हणून त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत.
धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट – नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख’ अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत. त्यामध्ये पुणेकरांना आता नवीन ओळख पाहिजे. असे बॅनर लावण्यात आले आहे. पुढे तुमचाच मतदार बंधू आणि भगिनी असंही लिहिण्यात आलं आहे.