पुलाच्या उद्घाटनाला 1760 विघ्न ! सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचं काम पूर्ण मात्र उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

96 0

पुण्यातील प्रचंड ट्रॅफिकचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहगड रस्त्याला ट्रॅफिक मधून मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला. 2021 मध्ये या पुलाचे काम चालू झाले आता 2024 मध्ये या पुलाचा पहिला टप्पा बांधून पूर्ण झालाय मात्र तरी देखील हा पूल अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांना या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करायचे आहे मात्र त्यांची वेळ मिळत नसल्यामुळे हा पूल खुला करण्यात येत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.

कसा आहे उड्डाणपूल ?

सिंहगड रोडवर होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर या पुलाला मंजुरी मिळाली आणि 2021 मध्ये मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं भूमिपूजन पार पडलं. हा पूल दोन टप्प्यांमध्ये आहे. राजाराम चौकाच्या अलीकडे सुरू होऊन चौकाच्या पलीकडे पुलाचा पहिला टप्पा संपतो. तर दुसरा टप्पा विठ्ठलवाडी च्या कमानीपासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा आहे. पुलाची संपूर्ण लांबी 2120 मीटर इतकी असून रुंदी 16.3 मीटर इतकी आहे. या पुलासाठी 118 कोटी रुपये खर्च केला जात आहे. महानगरपालिकेच्या अभ्यासानुसार या पुलावरून दररोज लाखभर वाहनांची वाहतूक होणार आहे. यातील राजाराम चौकातील पहिल्या पुलाची लांबी कमी असून दुसरा पूल लांबीने जास्त आहे. त्यामुळेच राजाराम चौकातील पूल बांधून तयार झालाय. अगदी पुलावर विजेचे खांब, रंगकाम आणि दिशादर्शक फलकही लावून झालेत. मात्र तरीही हा पूल खुला होत नसल्याने स्थानिकांमध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide