Sharad Pawar

Sharad Pawar : अजितदादा गोविंदबागेत भेटायला का आले नाही? शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

1079 0

पुणे : दिवाळी पाडवा निमित्त बारामती येथील गोविंदबागेत आयोजित केलेला भेटीगाठीचा कार्यक्रम संपला. दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेत असतात आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात.याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील चार आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये असून सुद्धा शरद पवार यांची पाडवा निमित्त भेट घेतलेली नाही. त्यामुळे चर्चाना उधाण आले. अजित पवारांच्या गैरहजेरीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
‘रोहित पवार हे बीडला आहेत. तिकडच्या लोकांनी मला सांगितलं त्यांची तिकडे यात्रा सुरू आहे. मात्र काहींचे व्यक्तिगत आजार असतात, वैयक्तिक काम असतात त्यामुळे काही जण आले नसतील, असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांच्या गैरहजेरीवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार गोविंद बागेत आले नाहीत पण मात्र पार्थ पवार गोविंद बागेत आले आणि पवारांना भेटून गेले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

काय अजित पवार कसं वाटलं जबरदस्तीनं आरती करताना ? निलेश राणेंचा खोचक टोला

Posted by - April 17, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण…

EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

Posted by - November 8, 2022 0
EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा…

मोठी बातमी : कसबा चिंचवड पोटनिवडणूकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड करणार मदत

Posted by - February 10, 2023 0
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून, आज संभाजी…

मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - May 31, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *