दिल्ली: दिल्लीतील कथित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणांमध्ये सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती.
त्यानंतर तब्बल 177 दिवसांनी अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त जमीन मंजूर झाला. आणि अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर आले तुरुंगाबाहेर आल्यानंतर आज दिल्लीतील कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना अरविंद केजरीवाल यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री पदचा राजीनामा देण्याच्या घोषणेसह महाराष्ट्राबरोबर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकाही घेण्यात याव्यात अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास कोण दिल्लीचा मुख्यमंत्री होऊ शकतं याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण?
सुनिता केजरीवाल: अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे सध्या आप समन्वयक म्हणून जबाबदारी आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये असताना सुनीता यांनी पक्ष संघटना सांभाळली असून केजरीवाल यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं
राघव चड्डा: आम आदमी पक्षाचा दिल्लीतील महत्त्वाचा चेहरा अशी ओळख असणारे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांचं नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.
आतिशी मार्लेना: दिल्ली सरकारमध्ये अर्थमंत्री असणाऱ्या आतिशी मार्लेना या सध्या दिल्ली सरकारमधील सर्वात ताकदवान मंत्री असल्याचे बोलला जात असून अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासून अशी अतिथी यांची ओळख आहे आणि यामुळेच त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ टाकली जाण्याची शक्यता आहे.
संजय सिंग: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांची पक्षातील आक्रमक आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळख आहे आणि यामुळे केजरीवाल यांचे उत्तराधिकारी म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची मान संजय सिंग यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
सौरभ भारद्वाज: अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री पदासह शहरी विकास, ग्रामविकास, जलसंपदा व जलसंधारण इत्यादी खतांची जबाबदारी असणारे सौरभ भारद्वाज हे देखील दिल्लीचे केजरीवालानंतरचे मुख्यमंत्री असू शकतात