मुंबई : तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याची (Nawab Malik) चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. यानंतर अखेर आता नवाब मालिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
“मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिक यांच्या या विधानामुळे ते अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. पण बदलेल्या राजकीय स्थितीत ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मलिकांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.