राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुका अवख्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात. त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केलीये.
आज मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. जागा वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचा निर्णयही भाजपच्या कमिटी बैठकीत देण्यात आला आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते.