Vijay Shivtare

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

491 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अतंर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध कायम आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. बारामतीचा सातबारा हा काही पवारांच्या नावावर नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं हा वाद आणखी वाढला. यानंतर त्यांच्यावर महायुतीमधील नेत्यांकडून टीका होऊ लागली. यानंतर गुरुवारी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

भेटीमध्ये काय झाली चर्चा?
विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये यासंदर्भात तब्बल दीड तास चर्चा झाली. विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विजय शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुढील दोन दिवसांत यावर सकारात्मक तोडगा काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना दिलं. तोपर्यंत शांत राहावे असं आवाहनदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

केले ‘हे’ मोठे वक्तव्य
एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर देखील विजय शिवतारे यांचा अजित पवार यांना विरोध कायम आहे. बारामतीची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे, या मतदारसंघातून सुनेत्रा पवार याच उमेदवार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. यावरून विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का? त्यांचं योगदान काय, हे चालनार नाही. उद्या तुम्ही म्हणाल अजित पवारांच्या शिपायला मतदान करा, घराणेशाहीचा विरोध झालाच पाहिजे’ असे वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!