नागपूर : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले आणि बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे (Suresh Kute) प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. आयकर विभागाच्या कारवाईमुळेचं कुटे कुटुंब भाजपमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.