Chandra Mohan

Chandra Mohan : दाक्षिणात्य अभनेते चंद्र मोहन यांचे निधन

615 0

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 9.45 वाजता हैद्राबादनमध्ये असलेल्या जुबली हिल्स परिसरातील एका प्रायव्हेट रुग्णालयात त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे 82 वर्षांचे होते. चंद्र मोहन यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला आहे. मल्लमपल्ली चंद्र मोहन यांच्या कुटुंबात आता दोन मुली आहेत. मल्लमपल्ली चंद्र मोहन हे दिग्गज दिग्दर्शक विश्वनाथ यांचे चुलत भाऊ होते. मल्लमपल्ली चंद्र मोहन यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या निधनावर वेंकटेश दग्गुबाती, नानी, राम चरण आणि साई धरम तेज सारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

मल्लमपल्ली चंद्र मोहन यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या कृष्णा जिल्ह्याच्या पमिदिमुक्कुला गावात झाला होता. तर त्यांचं खरं नाव चंद्रशेखर राव मल्लमपल्ली आहे. त्यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगुला रत्नम’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी श्रीदेवी, जया प्रदा, जयासुधा सारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम केले आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे चंद्र मोहन यांना बेस्ट अ‍ॅक्टरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पदाहारेला वायसु’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये उसळली गर्दी; Video आला समोर

Posted by - September 21, 2023 0
मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा (Lalbaugcha Raja) कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…
Deepfake Technology

Deepfake Technology : रश्मिकानंतर आलिया भट्ट ‘डीपफेक’ची शिकार; Video व्हायरल

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डीपफेक टेक्नॉलॉजी (Deepfake Technology). या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या…

अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

Posted by - March 13, 2023 0
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यंदाच्या अकादमी…
Tiger Viral Video

Tiger Viral Video : चक्क एक माकड पडले 2 वाघांवर भारी; वाघांनी घटनास्थळावरून ठोकली धूम

Posted by - November 18, 2023 0
जंगल म्हंटले कि आपल्या समोर वाघ, सिंह यासारखे शक्तिशाली प्राणी येतात. या जंगलात (Tiger Viral Video) लहान प्राण्यांना नेहमी मोठ्या…
Metro Viral Video

भर मेट्रोत कपलचे कडाक्याचे भांडण; भांडणाचे कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Posted by - June 15, 2023 0
नवी दिल्ली : अनेक लोक दैनंदिन जीवनात मेट्रोने प्रवास करत असतात. यामध्ये अनेक प्रवाशांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणावरुन भांडणं होताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *