देशात समान नागरी कायदा आणावा ; ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंची मागणी

506 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती.

राज ठाकरे म्हणाले, ”भाषण करताना आज माझा टेबल फॅन होणार आहे. माझ्या गाडीच्या ताफ्याला कोणीतरी आडवणार आहे, ते महाराष्ट्रातील गुप्तचर यंत्रणेला समजलं, परंतु पवार साहेबांच्या घरावर कोणी हल्ला केला त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं का? गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून आज ठाण्यात जाहीर सभा घेत आहे.”

या सभेत राज ठाकरे  म्हणाले, ”आजची सभा स्क्रीन लावून जम्मूमध्ये दाखवली जात आहे. अनेक पत्रकार राजकीय पक्षांचे मांडलिक बनले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक पत्रकार आपली स्वत:ची एक स्क्रीप्ट घेऊन आले होते. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कशाप्रकारे एकत्र आले त्यावर मी गुढीपाडव्याच्या वेळी बोललो होतो. मला कोणत्याही प्रकारचा ट्रॅक बदलण्याची गरज वाटत नाही. तसेच कोणत्याही नोटीसी येऊदे मग त्या राजकीय असो किंवा कायदेशीर मी त्यास भीक नाही घालत. ज्यावेळी मोदी सरकारने जम्मू-काश्मीर संबंधातील कलम 370 रद्द केलं त्यावेळी ट्वीट करणारा पहिला व्यक्ती मी होतो. देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण करणारा कायदा आणा अशी मी मागणी मोदी सरकारकडे करतोय.”

Share This News
error: Content is protected !!