कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय तर राज साहेबांच्या हातात राज्याची सत्ता दिली तर अमेरिकेतून आपल्याला मागणी येईल असा विश्वास मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
ते ठाण्यातील राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेत बोलत होते.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की मला भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा प्रवेशाच्या ऑफर दिली असून मी त्यांना पंधरा वर्ष भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करूनच निवडून येतोय असं सांगितलं असल्याचे देखील मोरे यांनी यावेळी सांगितलं
https://t.co/f0KelIENaw
TOP NEWS MARATHI LIVE: पुण्यात टिझर, मुंबईत पिक्चर आणि आज ठाण्यात उत्तरसभा… मनसे अध्यक्ष राज ठाकरे LIVE#RajThackeray #Rajlive #MNSAdhikrut #Thane #Balanandgaokar #vasantmore #sandeepdeshpande #live #marathinews #topnewsmarathi #topnewsmarathilive— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) April 12, 2022