पुणे जिल्ह्यातील मावळ आणि हवेली तालुक्यात अनधिकृत प्लॉटींग करुन जागामालक व विकसक हे विक्री, विकसनाचे काम करत असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या सर्वेक्षणातून समोर आले असून त्यानुसार पीएमआरडीएने कडून तिरुपती ग्रुपच्या स्वामी समर्थ डेव्हलपर्स, तिरुपती स्पर्श डेव्हलपर्स, साई गणेश डेव्हलपर्स, गोल्डन तिरुपती डेव्हलपर्स यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तर नमो पार्कवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणि रिव्हर व्ह्यू पार्कवर हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54, 56 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
