Uddhav thackeray On Raj Thackeray

ठाकरे गटाच्या पोस्टमुळे राज – उद्धव ठाकरे एकत्र येण्याची पुन्हा चर्चा

375 0

मुंबई : शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने “एक्स” या सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्याची वेळ जवळ आली असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात रंगली आहे.

“वेळ आलीयं, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी ! ” अशा आशयाची पोस्ट शिवसेना, ठाकरे गटाने केली आहे. या पोस्टवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची वेळ निश्चित झाली असल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. दोघे भाऊ एकत्र येण्याची चर्चा करण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनानंतरचा मुहूर्त साधणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मनसे – उबाठा युती होण्याची वेळ अगदी जवळ आल्याची चर्चा आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही परदेश दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे २९ एप्रिल रोजी तर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे स्वतः संभाव्य युतीबाबत भाष्य करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरे गटाने केलेल्या पोस्टमधून या घडामोडीचे स्पष्ट संकेत मिळू लागल्याचे बोलले जात आहे.

तिकडे मनसे आणि शिवसेना उबाठा गटाच्या युतीवरून कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी देखील सुरू केली आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या’ असे बॅनर झळकवले आहेत. या बॅनरमध्ये “उद्धवसाहेब…. आम्हांला आमीष दिले गेले.. मोठमोठ्या ऑफर आल्या… दबाव टाकला.. पण, साहेब आम्ही डगमगलो नाही घाबरलो नाही, तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो…. आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्री चे आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या…. कळकळीची विनंती आहे साहेब, असा मजकूर लिहिलेला आहे. राज ठाकरे यांना मातोश्रीवर बोलवा, असे साकडे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना घातले आहे. त्यामुळे राज ठाकरे – उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येतील, अशी शक्यता आहे.

RAJ THACKERAY: मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको- राज ठाकरे

BEED POLICE : बीड जिल्ह्यात ड्युटी नको यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज

BEED SATISH BHOSLE VIRAL VIDEO: सुरेश धसांच्या गुंड कार्यकर्त्याचं राक्षसी कृत्य; गरिबाला बॅटने मारहाण करणारा तो भाजप पदाधिकारी कोण ?

Share This News
error: Content is protected !!