सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला. बीडच्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी वाढत आहे. या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये परिक्षेत्रातमध्ये ज्यांचा कालावधीत पूर्ण झाला आहे असे अगदी ४ ते५ अधिकारी आहेत. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकापासून,पोलीस निरीक्षक , (DYSP) पोलीस उपअधीक्षक आणि १५ ठाण्याचे प्रमख आहेत. असे जवळ जवळ १०७ अधिकाऱ्यांनी बदलीचे अर्ज केले आहेत.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांना सांगितले होते की चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मात्र इथे पालकमंत्र्यांनी असे ठणकावून सांगितल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांची बदली बद्दलची मागणी का होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी बदल्यांच्या कारणांची पडताळणी केरून निर्णय सांगितला जाऊ शकतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड पोलीसांवर प्रश्नचिन्ह करण्यात आला होता त्यानंतर परळीमधील महादेव मुंडे हत्या प्रकरण त्यामध्ये देखील पोलिसांवरती संशय व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये सुरेश धस ,बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर या सर्वांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले होते. यामुळे पोलीस अधिकारी बदलीची मागणी करू लागले आहेत.