BEED SATISH BHOSLE VIRAL VIDEO: सुरेश धसांच्या गुंड कार्यकर्त्याचं राक्षसी कृत्य; गरिबाला बॅटने मारहाण करणारा तो भाजप पदाधिकारी कोण ?

BEED SATISH BHOSLE VIRAL VIDEO: सुरेश धसांच्या गुंड कार्यकर्त्याचं राक्षसी कृत्य; गरिबाला बॅटने मारहाण करणारा तो भाजप पदाधिकारी कोण ?

1082 0

वाल्मीक कराड या मित्र कम कार्यकर्त्यामुळे धनंजय मुंडे यांचं संपूर्ण राजकीय करियर धोक्यात आला असताना बीड मधल्याच आणखी एका गुंडाचा कारनामा समोर आलाय. विशेष म्हणजे हा गुंड एका मोठ्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता आहे. या गुंडाने एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण केली, याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल (viral video) ही केला. त्यानंतर सर्वच स्तरातून आता टीका होत आहे. या हैवान कार्यकर्त्याचं नाव सतीश भोसले (satish bhosale BJP) असं असून तो संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणाऱ्या आमदार सुरेश धस (suresh dhas) यांचा कार्यकर्ता असल्याचा सांगितलं जात आहे.

कोण आहे हा सतीश भोसले ?

बीड आणि तिथली गुन्हेगारी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आक्रोशाच वातावरण आहे. त्यातच बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी ठिकाणी एका व्यक्तीला अमानवीय पद्धतीने मारहाण करत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब कुटुंबातील तरुणाला बेदम मारहाण करतोय. हा तरुण त्याच्याकडे याचना करताना दिसतोय मात्र तरी या हैवानाला त्याची जराही दया आली नाही. मारहाण होत असलेल्या व्यक्तीचे नाव ढाकणे असून त्याला मारहाण नेमकी का केली गेली याविषयीची माहिती समोर आली नाही. मात्र मारहाण करत असलेला सतीश भोसले हा गुंड प्रवृत्तीचा तरुण बीड मधील भाजपचा कार्यकर्ता आहे. तो भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्याचबरोबर तो आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. स्वतःला लोकप्रतिनिधी आणि एका मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या या सतीश भोसलेने एका गरीब व्यक्तीला मारहाण करताना पुढचा मागचा विचार केला नाही. या व्हिडिओ त्याच्याबरोबर आणखी दोन ते तीन जण दिसत आहेत. मात्र कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. एवढंच काय तर इतक्या गंभीर घटनेनंतरही या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावरूनच सतीश भोसले याची या परिसरात किती दहशत असेल याचा अंदाज लावता येतो.

बीड मधील गुंडाराजची नवनवीन प्रकरण समोर येत असताना आता या व्हिडिओमुळे आणखी खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आठ ते दहा दिवस जुना असल्याची माहिती मिळत असून अजूनही सतीश भोसले वर कारवाई का झाले नाही अशा संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांतून समोर येत आहेत. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर सतीश भोसले सारख्या प्रवृत्ती ठेचणे गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्राला पुन्हा नवं संतोष देशमुख हत्या प्रकरण यांच्यासारख्या गुंडांमुळेच पहावं लागू शकतं. त्यामुळे या भोसले वर नेमकी कारवाई कधी होते याकडे सध्या सर्वांच लक्ष लागलंय.

Share This News
error: Content is protected !!