नागपूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात ते मुख्य आरोपी होते. नागपूरच्या खंडपीठाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाने शुक्रवारी सुनील केदार यांना 12.50 लाख रुपये दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सुनील केदार यांच्यावर आरोप काय?
माजी मंत्री सुनील केदार हे 1999 साली नागपूर जिल्हा बँकचे अध्यक्ष झाले होते. 2002 साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 156 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. बँकेच्या रकमेतून होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या.
सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात आली होती. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. त्यामुळे सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी,यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी कोर्टाने यावर निकाल दिला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी