Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

379 0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेसाठी ‘हे’ नेते होते इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News
error: Content is protected !!