पुणे : आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (Pune District Bank) संचालकपदाची निवडणूक पार पडत आहे. अजित पवारांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेच्या बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली असून पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक घोषित करण्यात आली होती. अजित पवार देतील तोच संचालकपदाचा उमेदवार असेल अशी भूमिका बँकेच्या संचालक मंडळाने घेतली होती.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदासाठी सुनेत्रा आणि पार्थ पवार उमेदवारी अर्ज भरणार नाही आहेत. त्यामुळे आता सगळ्या राजकीय चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे.