SANJAY RAUT

संजय राऊत राजकारणातले प्रेम चोपडा ‘या’ नेत्याने केली टीका

673 0

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांना काही ना काही बडबड करून कोणाला नांदू द्यायचं नाही असे म्हणाले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट ?
संजय राऊतांवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुलं होत नाहीत म्हणतात. पण संजय राऊत असा चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुल होईल असं सांगण्याचा पर्याय आहे अशी टीका त्यांनी केली.

यावेळी संजय शिरसाट मंत्रीमंडळाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले कि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच लोकसभेसाठी (Loksabha Election) जागा वाटपाची प्राथमिक बोलणी सुद्धा सुरू झालेले नाही आमची बोली सुरू होईल त्याच्यानंतर योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे ते म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!