Maharashtra Politics : “शिवसेनेच अस्तित्वच भाजपमुळे”…! भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका (Video)

194 0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या माध्यमातून त्यांच्या मनातील खदखद तीव्र शब्दात मांडली आहे. यामध्ये त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या मुलाखतीनंतर आज सकाळपासूनच शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी थेट त्यांच्या मुलाखतीतील प्रत्येक खोचक वक्तव्यावर आपले प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

“शिवसेनेचा अस्तित्वच मुळी भाजपमुळे ” असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना थेट शिवसेनेच्या अस्तित्वावरच बोट ठेवले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

 हे हि वाचा : Maharashtra Politics : “उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत” ; शिवसेनेचे बंडखोर आ.संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर (Video)

यासह ” उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे रुदालीचा कार्यक्रम होता. मुलाखतीपेक्षा टिझर तरी बरा होता . संपूर्ण मुलाखत स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी होती . गर्भगळीत अशी ही मुलाखत होती. ” अशी खोचक टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!