Shiv Sena

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

692 0

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. खरी शिवसेना (Shiv Sena) ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हंटले आहे. तसेच भरत गोगावले याची प्रतोदपदी नियुक्ती ही देखील योग्य असल्याचे निकालात म्हंटले आहे. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार?
मार्च 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत निकाल राखून ठेवला होता. त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या पारड्यात चेंडू टाकला अन् 10 जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. अशातच आता ठाकरे गटाकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल.

शिंदे गटाचे आमदार
एकनाथ शिंदे , शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव , संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे.

ठाकरे गटाचे आमदार
अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटिल, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide