मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. दरम्यान, या सत्तासंघर्षात आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. ऐतिहासिक असा हा निकाल असणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निकाला अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ‘या’ बैठीमध्ये एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निणर्य
1) राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
2) ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
3) शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक 44 द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
4) ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
5) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
6) पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान .50 हजारांवरूनएक लाखांपर्यंत करण्यास मान्यता
7) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम,1999 लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
8) राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार
Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी
Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव