Sanjay Ghodke

Sanjay Ghodke : ठाकरेंचे कट्टर समर्थक संजय घोडकेंचे निधन; पंढरपूरचे ‘आनंद दिघे’ अशी होती ओळख

778 0

सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान तालुकाप्रमुख तथा पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके (वय 60) (Sanjay Ghodke) यांचे आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

पंढरपूर मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग आहे. शाखा प्रमुखापासून त्यांचा शिवसेनेतील प्रवास सुरु झाला. पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने काम केले. ते लहानपणापासून दिवंगत धर्मवीर आनंद दिघेंचे मोठे चाहते होते. विशेष बाब म्हणजे, त्यांना पंढरपूरचे आनंद दिघे म्हणून देखील ओळखले जात होते.

शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके यांची ओळख होती. धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, स्व. मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. घोडके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

Share This News
error: Content is protected !!