नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा तब्बल आठशे मतांनी पराभव झाला आहे.
याविषयी बोलताना उत्पल पर्रिकर हे आमच्या परिवारातील सदस्य असून त्यांच्या पराभवाचं आपल्याला दुःख झाले असून त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज आमदार राहिले असते असं मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं
त्याच बरोबर शिवसेनेची लढाई आमच्याशी नसून ती नोटासोबत होती असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.