Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या पॅनेलने पवारांच्या पॅनलचा केला पराभव; एकहाती जिंकली निवडणूक

698 0

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची 23 जून रोजी निवडणूक झाली होती. राज्यातील एकूण 281 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती .आज या निवडणुकीचा निकाल लागला असून यात एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने सर्वच 19 जागांवर विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी महामंडळातील प्रस्थापित संघटनांना मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे ,सातवा वेतन आयोग या मागण्यांसाठी सुमारे साडे पाच महिने एसटी कामगारांचा संप चालू होता. त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत दिसून आला आहे.

KCR : उद्या एकादशी अन् आज केसीआरच्या ताफ्याला धाराशिवात बोकडाच्या मटणाची पार्टी

विविध पक्षांच्या प्रस्तापित कामगार संघटनांना धूळ चारत, नव्याने एसटी महामंडळात आलेल्या दोन संघटनांनी मुसंडी मारण्यात यश मिळवले आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही संघटनेने बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा ही जास्त मतदान घेतले आहे. यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅननले एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेना हे पॅनल सुद्धा आखाड्यात होतं. मात्र, या पॅनललाही सदावर्तेंच्या पॅनलने धक्का दिला.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide