बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. यावेळी भाषण करताना रोहित पवार मोठ्या प्रमाणात भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
काय घडले नेमके?
रोहित पवार म्हणाले, आम्हाला सुप्रिया ताईंना देशाची कृषीमंत्री म्हणून बघायचे आहे. यावेळी रोहित पवार यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सभेत लावला. या व्हिडीओत चंद्रकांत पाटील म्हणाले होते, की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नाही. विरोधकांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या टीकेचा व्हिडीओ रोहित पवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून बारामतीकरांना दाखवून दिले. यावेळी बोलताना रोहित पवार भावनिक झाले. त्यांना स्टेजवरचं रडू कोसळलं. रोहित पवार रडल्यानंतर त्यांच्या आई सुनंदा आणि पत्नी कुंती पवार देखील काहिशा भावनिक झाल्याचं बघायला मिळालं.
शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जयंत पाटील, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राजेश टोपे, भास्कर जाधव, रोहित पवार, रोहित पाटील या नेत्यांनी सभा घेतल्या. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, हर्षवर्धन पाटील, धनंजय मुंडे, रामदास आठवले, दत्तात्रय भरणे, महादेव जानकर, बाबा सिद्दिकी, चित्रा वाघ आदींनी सभा घेतल्या आहेत. यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
T20 World Cup 2024 : टी – 20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर
Thane News : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघात
Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या
Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा
Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित
KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू