Ranveer Singh Nude Photoshoot : “रणवीर सिंहचा नंगानाच चालतो , पण हिजाब चालत नाही…!” अबू आझमीनचा आक्रमक पवित्रा…(Video)

381 0

सोलापूर : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी नुकतेच एक न्यूड फोटोशूट केले आहे. त्याच्या या न्यूड फोटोशूटमुळे बॉलीवूड जगतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना, सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी यांनी रणवीरच्या या फोटोशूटवर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Ranveer Flaunts His Naked Self, Waxes Philosophical In Maga... | MENAFN.COM

यावेळी अबू आज मी म्हणाले की , ” रणवीर सिंह यांनी काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरीही आम्हाला काही अडचण नाही. मात्र जे लोक हिजाब घालतात , त्यांना या देशात विरोध कसा होऊ शकतो ? हिजाब परिधान करणाऱ्यांना ठीक ठिकाणी अडवलं जातं . त्यांना परीक्षेला बसू दिल जात नाही . जर तुम्हाला अडचण असेल , सुरक्षिततेबाबत काळजी वाटत असेल ,तर वैयक्तिक त्यांची तपासणी करून चौकशी करा. मात्र हिजाबवर बंदी तुम्ही आणू शकत नाही”. असा थेट टोला अबू आजमी यांनी लगावला आहे .

हे हि वाचा : PUSHPA 2 : ” मै झुकेगा नही साला” ;500 कोटींच्या बिग बजेटसह ‘या’ महिन्यात रिलीज होणार ‘पुष्पा 2’ … 

अभिनेता रणवीर सिंहच्या या न्यूड फोटो शूटमुळे जनतेतून चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याच्या या फोटोशूटचे समर्थन केले आहे. तर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी यास विरोध दर्शवला आहे. यावर अबू आझमी म्हणाले की , “सार्वजनिक स्थळावरती तुम्ही नग्न फिरू शकत नाही. हे कायद्याने चुकीचे आहे. रणवीर सिंहवर गुन्हा दाखल करण्या इतका मी मोठा नाही, मी अतिशय छोटासा व्यक्ती आहे. माझं कोण ऐकणार मी जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ठेवला आहे . जनतेने काय स्वीकार यायचं ते ठरवावे.” असे देखील ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!