राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र; केली ‘ही’ विनंती

187 0

मुंबई: नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची भेट घेतल्यानंतर आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून या पत्रात अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षांना लढवता ऋतुजा लटके या कशा आमदार होतील हे पहावं अशी विनंती केली आहे.

राज ठाकरे यांचं पत्र जसच्या तसं

प्रति

देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

प्रिय मित्र देवेंद्र सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विनंती करण्यास हे पत्र आपणास लिहितो आहे.

आमदार कै रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै.रमेश एक चांगले कार्यकर्ते होते अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली अर्पण करतो अशी माझी भावना आहे आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.

असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल

आपला मित्र

राज ठाकरे

त्यामुळं आता राज ठाकरे यांची विनंती देवेंद्र फडणवीस मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News

Related Post

Urfi Javed

Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे

Posted by - April 2, 2024 0
सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही विचित्र आणि हटके ड्रेसिंगमुळे नेहमी चर्चेत असते. ती प्रत्येतवेळी काही तरी वेगळी…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे फोटो पाहून भाजप खासदार म्हणाले खड्ड्यात गेली काँग्रेस; वाचा काय आहे प्रकरण?

Posted by - June 12, 2022 0
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी आपलं इंग्लिश तर…

अबब ! जळगावात पारा 44 अंशांवर

Posted by - April 9, 2022 0
जळगाव जिल्ह्याच्या उष्णतेचा पारा 44 अंश आकडे पोहोचला आहे, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये ,अशा…

पुण्यात विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - May 24, 2023 0
पुणे शहरातील विश्रांतवाडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विकास शिवाजी टिंगरे यांनी आपल्या कार्यालयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *