एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांचे फोन टॅप होत आहेत; कुणी केला दावा?

261 0

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि महायुती सत्तेत झाले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पाच डिसेंबर रोजी शपथ घेतली.

त्यानंतर 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर सातत्याने महायुतीमध्ये सारं काही अलबेला नाही अशा चर्चा होत असतानाच आता सामना रोखठोकमधून एक खळबळजनक दावा करण्यात आलाय.

सामना रोखठोकमध्ये नेमकं काय म्हंटलय?

सामना रोखठोकमध्ये फडणवीस शिंदे यांच्यात विसंवाद, बहुमत असूनही राज्य अस्थिर या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात निवडणुका एकत्र लढू आणि निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री असाल असा शब्द भाजपाने एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा करण्यात आला असून मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे मनाने कोलमडले असून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांचे फोन टॅप केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!