nilesh rane

पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद; निलेश राणेंची टीका

890 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. या निर्णयांमध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) दिलास मिळाला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर केंद्रीय मंत्री निलेश यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय म्हणाले निलेश राणे?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुमची तुमच्या सल्लागारांनी वाट लावली. चांगली लोकं तुम्हाला चालत नाही म्हणून तुमची ही अवस्था. पळपुटे ठाकरे म्हणून तुमची इतिहासात नोंद झाली अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात; नाहीतर आज झाले असते पुन्हा मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात 15 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरतला गेले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर शिंदे यांना आणखी 24 आमदार येऊन मिळाले होते. यानंतर 10 अपक्षांनी देखील पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला होता. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना भेटून सरकार अल्पमतात असल्याचे सांगितले. त्यानंतर कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदेनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले.

Share This News

Related Post

महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- अभाविपची मागणी 

Posted by - March 18, 2023 0
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन दिवसीय भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषद

Posted by - January 30, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ व २ फेब्रुवारी रोजी भाषांतर आणि अध्यापनशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात…
Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 18, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण…

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : संकेत भोसले हत्या प्रकरणी (Sanket Bhosle Murder Case) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी…

‘पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या दोन मुद्द्यांवर झाली चर्चा’, शरद पवार यांचा खुलासा

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली – शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबाबत संपूर्ण देशामध्ये कुतूहल निर्माण झाले होते. नेमकी काय चर्चा झाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *