राज्यातील सत्तासंघर्षावर 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता 29 नोव्हेंबर रोजी म्हणजेच चार आठवड्यांनी ठरेल. 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची, हे सांगितलं जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहेत.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही गटातर्फे युक्तिवाद झाले. कोर्टाने दोन्ही पक्षकारांना युक्तिवाद लिखित स्वरुपात देण्याचे आदेश दिले आहेत. तीन आठवड्यात यासंदर्भातील कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
