पुणे : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. ते पंढरपुरात महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. इंडिया आघाडीच्या कोर कमिटीनं बोलावलेल्या बैठकीला हजर राहण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. यामुळे शरद पवार यांनी आपला सोलापूर जिल्हा दौरा रद्द केला आहे.
मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शरद पवार मुंबईला रवाना झाले आहेत. शरद पवार मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीला हजर राहणार असल्यानं त्यांचे आजचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांच्यासोबत नातू युगेंद्र पवार देखील मुंबईला रवाना झाले आहेत.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. तिथे ते पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिचं असल्यानं त्यांनी आपला सोलापूर दौरा अचानक रद्द केला. ते बारामतीमधून मुंबईकडे रवाना झाले.यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.