पुणे : भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची तुलना नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याशी केली आहे. यानंतर राज्यात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी राणेंवर जोरदार टीका केली.
काय म्हणाल्या रुपाली पाटील?
गौतमी पाटील ही पोटासाठी काम करते. परंतु तिची तुलना संजय राऊत यांच्याशी का करायची? तिने मागे केलेल्या चुका आता सुधारल्या आहेत. परंतु हे लोक महिलांना हिणवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते भाजपचे नाचे आहेत का? तमाशामध्ये जसं मध्येच येऊन नाचे नाचतात, तसं ते आहेत का? असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांना समज द्यावी असेदेखील रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
नितेश राणे यांनी पोटासाठी व्यवसाय करणाऱ्या महिलेवरून हिनवणे अयोग्य आहे,राजकारण किती खालच्या पातळीवर नेत आहे याचा भाजपने नक्की विचार करावा,अजून किती घाण करणार आहात तुम्हाला जशास तसे बोलायचे झाले तर मग तुम्ही भाजपचे नाच्या,
वाचाळ,राजकारणाचीसंस्कृती बिघडणाऱ्या नाच्याचा जाहीर निषेध.— Rupali patil thombare (@Rupalispeak) May 27, 2023
काय म्हणाले नितेश राणे?
संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. राऊत यांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. गौतमी पाटीलला विनंती करेन तुझं मेकअपचं सामान संजय राऊतांना पाठवून दे.’आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून हे महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलने करू नये, अशी खोचक टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती.