आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

नाशिक पदवीधर मतदारसंघ : सत्यजित तांबे VS शुभांगी पाटील ! पहिल्या पसंतीचा कल कोणाच्या बाजूने ?

नाशिक : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालं होत. आज या ५ जागांसाठीचा निकाल लागणार आहे. विधानपरिषदेच्या या पाच जागामध्ये तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी आहेत.

अधिक वाचा : बातमी : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं ; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.28 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा : निवडणूक निकालापूर्वीच पाषाणमध्ये अभिनंदनाची बॅनरबाजी; ” जीत सत्याचीच…! आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन… ” वाचा ही बातमी

त्यामुळे आता जनतेच्या मनातील आमदार कोण सत्यजित तांबे कि शुभांगी पाटील ले लवकरच स्पष्ट होईल.