Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : ‘बालिश चाळे सोडा अन् आहे तो पक्ष तरी..’ ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला

4102 0

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी ठाणे दौरा केला. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचे उद्घाटन केले आणि अन्य शाखांना भेटही दिली. यानंतर आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिंदे गट, भाजपा आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना (शिंदे गट) चे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले नरेश म्हस्के ?
‘काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. यापुढे त्यांना नकला करणे हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार. तमाशा मध्ये एक पात्र असतं आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे. त्याला नाचा म्हणतात आणखी काही वेगवेगळे म्हणतात. आता त्यांना मी नाचा म्हणत नाही परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं आणि ते काम काल त्यांनी ठाण्यामध्ये येऊन केलं.’ अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivneri Bus : शिवनेरी बस उद्यापासून ‘अटल सेतू’ वरुन धावणार

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!