पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. यातील अनेक बोर्ड अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
किल्ले शिवनेरीच्या (Shivneri Fort) पायथ्यापासून तर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत गाडी रोडच्या कडेने असलेल्या विद्युत पोलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले अनेक बोर्ड लावण्यात आले होते.शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र यातील अनेक बोर्ड अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बारामतीमध्ये देखील घडला होता. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांकडून ते फ्लेक्स हटवण्यात आले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी