पुणे : पुण्यातून (Pune Crime Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गाडी पार्क करण्याच्या किरकोळ झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करत तरुणाची चारचाकी जाळण्यात आली. या सगळ्या प्रकारादरम्यान एक महिला हा सगळा प्रकार बघण्यासाठी आली असता तिलादेखील जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काय घडले नेमके?
यातील फिर्यादी महेश राजे हे पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहायला असून त्यांचा आरोपीसोबत चार चाकी गाडी पार्किंग करण्यावरून वाद झाला होता. या रागातून धीरज सपाटे,आकाश गायकवाड, सुरज बोरुडे, विशाल ससाने यांच्यासह दहा अज्ञात आरोपींनी या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी विरोधात चंदनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात
Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी