accident

राज ठाकरेंच्या सभेसाठी रत्नागिरीला निघालेल्या मनसे नेत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

469 0

रत्नागिरी : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी या ठिकाणी एक जाहीर सभा आहे. या सभेसाठी मनसे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी दाखल होणार आहे. मात्र हि सभा सुरु होण्याच्या अगोदर रत्नागिरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील सभेला जात असताना झालेल्या अपघातात एका मनसे नेत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
देवा साळवी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते दहीसर या ठिकाणी मनसेचे उपाध्यक्ष आहेत. या अपघातामध्ये आणखी 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर संगमेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

रत्नागिरीमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा
आज रत्नागिरीमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News
error: Content is protected !!