मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महायुतीकडून होत असतानाच अनेक नाराज नेत्यांना महामंडळाचे वाटप करण्यात येत आहे.
आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेच्या चार बड्या नेत्यांची महामंडळावर वर्णी लागली आहे.
आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी, माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री, आनंदराव अडसुळे यांचे राज्य अनुसूचित जाती महामंडळाच्या अध्यक्षपदी तर लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून तिकीट कापलेले माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती.
त्यानंतर आता आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवडणे लागली असून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंबरोबर गुवाहाटीला भरत गोगावले गेले होते त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे आशा होती आणि ही मंत्रीपदाची इच्छा अनेकदा भरत गोगावले यांनी जाहीरपणे माध्यमांवर बोलून देखील दाखवली होती. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता भरत गोगावले यांची महामंडळावर वर्णी लागली आहे.