मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जोरदार जागावाटपावरून चर्चा पाहायला मिळत असून महाविकास आघाडीमध्ये 18 सप्टेंबर पासून सलग तीन दिवस जागा वाटपावर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.
या बैठकीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याखालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इच्छुक आहे.
याच संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला नेमकं महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षांनं सर्वाधिक जागा लढवाव्यात असं वाटतं असा सर्व्हे करण्यात आला होता या सर्व्हेमध्ये 16 हजाराहून अधिक नागरिकांनी आपली मतं नोंदवली आहेत.
या सर्व्हेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक म्हणजे 51% पसंती मिळाली असून त्या खालोखाल काँग्रेस पक्षाला 35% इतकी पसंती मिळाली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सर्वात कमी म्हणजे केवळ 9% इतकी पसंती मिळाली आहे तर सांगता येत नाही असं 4% लोकांचं मत आहे.
एकंदरीतच आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटप कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.