मुंबई: लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून नुकतीच भाजपाने 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती ही जाहीर केली आहे.
याबरोबरच येत्या 18 सप्टेंबरला भाजपाचे वसंत स्मृती मुंबई या मुख्यालयामध्ये कोअर कमिटीची बैठक होणार आहे या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये महायुतीचे जागावाटप आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी भाजपाने मिशन 125 आपलं असल्याची माहिती समोर आली असून यासाठी भाजपाने नेत्यांकडं विभागनिहाय जबाबदारी दिली आहे
कोणत्या नेत्याकडे कोणत्या विभागाची जबाबदारी
- विदर्भ – चंद्रशेखर बावनकुळे
- कोकण – रवींद्र चव्हाण
- मराठवाडा – अशोक चव्हाण
- पश्चिम महाराष्ट्र – मुरलीधर मोहोळ
- उत्तर महाराष्ट्र – गिरीश महाजन
- मुंबई – आशिष शेलार