नुकतीच महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईच्या जागा वाटपावर चर्चा झाली असून मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार निवडणुकीच्या तयारीला लागले असून नुकतीच महाविकास आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागा वाटपावर चर्चा झाली असून विधानसभेच्या मुंबईतील 36 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 20 ते 22 जागांवर दावा ठोकला आहे. तर काँग्रेस पक्ष हा 13 ते 15 जागांवर आग्रही आहे. चर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाच ते सात जागांवर आपला दावा ठोकला. मुंबईतील काही जागांवर तिन्ही पक्ष हे दावा करत आहेत. ज्या जागांवर मतभेद नाहीत ज्या ठिकाणी जागावाटप केलं जाण्याची शक्यता आहे.