कोलकत्यातील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या विरोधात आणखी काही सबळ पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयने हस्तगत केले असून त्या ठिकाणहून संजय रॉय विरोधातील पुरावे हाती लागले आहेत. मात्र नुकतेच या आरोपींना सुरक्षा रक्षकाला एक वेगळीच कहानी सांगितली आहे.
एका तपास अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय रॉय हा पोलिसांची व तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपीच्या चेहऱ्यावर ज्या जखमा आढळून आल्या त्या नेमक्या कशाच्या आहेत याचे कारण देखील आरोपी सांगू शकला नाही. शनिवारी या आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट होणार होती मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ती झाली नाही. दरम्यान हा आरोपी सध्या कोठडीत असून प्रेसिडेन्सी जेलच्या सेल नंबर 21 मध्ये तो आहे. या कोठडीत तो एकटाच असून कोठडी बाहेर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपी संजय रॉय हा मानसिक रित्या विकृत असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर त्याला पोर्नोग्राफीचे व्यसन असल्याचे आढळून येत आहे. त्याचबरोबर आरोपीला आपण केलेल्या अपराधाबाबत कोणताही पश्चाताप नाही, अशी कबुलीदेखील त्याने दिली आहे. मात्र त्याने सुरक्षा रक्षक आला एक वेगळीच माहिती दिली आहे. महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे.