Pankaja-Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

858 0

बीड : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याने राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीमुळे भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये आता आपले कसे होणार या भीतीने अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याच्या चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

Indian Passport: भारतात ‘या’ 3 रंगाचे पासपोर्ट वापरले जातात; जाणून घ्या प्रत्येक पासपोर्टचे महत्व

काय रंगल्या आहेत चर्चा ?
भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पंकजाची पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे साठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे समोर आले आहे.

सकाळी शरद पवारांना पाठिंबा; रात्री अजित पवारांच्या गटात सामील; आमदार देवेंद्र भुयारांनी काही तासांतच का घेतला यूटर्न ?

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याचे समोर आले होते त्यामुळे आता ह्या चर्चा जास्त जोर धरु लागल्या आहेत. शिवाय पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर तर सर्वांनाच माहित आहे. सध्या पंकजा मुंडे पक्षाच्या महासचिव आहेत. त्यामुळे आता नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Share This News
error: Content is protected !!